७६वी सालार जंग निमंत्रित क्रिकेट स्पर्धा २०२६
मुंबई: इस्लाम जिमखाना आयोजित ७६व्या सालार जंग निमंत्रण क्रिकेट स्पर्धेच्या (२०२६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सोमवारी सलामीवीर प्रग्नेश कानपिल्लेवारच्या (नाबाद १०० धावा, ३६ चेंडू १२ चौकार, ७ षटकार) तडाखेबंद नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मारवाडी क्रिकेट क्लबने पारसी जिमखान्यावर १० विकेट राखून सहज विजय मिळवला.
कानपिल्लेवार याला त्याचा सलामीचा सहकारी शाश्वत जगतापची (नाबाद ७५ धावा, २४ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार) चांगली साथ लाभली..
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पारसी जिमखान्याने २० षटकांत ७ गडी गमावून१७२ धावा केल्या. जिमखान्याचे प्रमुख फलंदाज आयुष वर्तक (नाबाद ५६ धावा, ६७ चेंडू, २ चौकार, ५ षटकार) आणि साकिब मुलानी (३५ धावा) होते.
संक्षिप्त धावफलक: पारसी जिमखाना १७२/७, २० षटके (आयुष वर्तक ५६* (६७ चेंडू, २ चौकार, ५ षटकार), साकिब मुलानी ३५) मारवाडी सीसीकडून पराभूत, १७६/बिनगडी, १० षटके (प्रग्नेश कानपिल्लेवार १०० (३६ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार), शशवत जगताप ७५ (२४ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार). निकाल: मारवाडी सीसी १० विकेट राखून विजयी.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *