अशोक गायकवाड
पनवेल : एमजीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कामोठे यांच्यामार्फ़त जागतिक क्षयरोग दिननिमित्त क्षयरोग याविषयी सीएमई एम.जी.एम.मेडिकल कॉलेजला डॉ.जी. एस.नरशेट्टी व रायगड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न झाला. एमजीएम हॉस्पिटल हे एमडीआर टीबी साठी हेड क्वार्टर असून टीबी च्या उपचाराकरिता रायगड जिल्हा क्षयरोग कार्यक्रम व एमजीएम मध्ये करार झाला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रसाद वैगनकर, जन वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख आणि डॉ.प्रदीप व्ही.पोतदर श्वसन रोग विभाग प्रमुख यांच्यामार्फत करण्यात आले. डॉ.ज्योति सालवे यांच्या द्वारे टीबी, एमडीआर विषयी माहिती, प्रतिबंधात्मक उपाय व जनजागृति यावर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पनवेल शहर क्षयरोग अधिकारी डॉ.उषा नाईक यांनी क्षयरोग शासकीय कार्यक्रम व या कार्यक्रम करिता डॉ.समीर पाचपुते, डॉ.निखिल राणे, डॉ.पल्लवी कदम, डॉ.देवदत्ता दाबोलकर, डॉ.श्रीजा नायर, डॉ.शमा शेटये आणि उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग अधिकारी यासारखी मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते. तसेच १०० हून अधिक एम.जी.एम व इतर हॉस्पिटल,मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *