माथेरान : माथेरान रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागात आय लव्ह माथेरान हा प्लास्टिक फलक अनेक दिवसांपूर्वी काढण्यात आल्यामुळे याठिकाणी सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे. मिनिट्रेनने प्रवास करण्यास तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी तासंतास पर्यटक रांगेत उभे असतात. एका प्रवाशाला फक्त चार तिकिटे देण्यात येतात. दोन बोग्या द्वितीय श्रेणी,एक बोगी प्रथम श्रेणी आणि दोन मालवाहू बोग्यां असतात. गाडी सुटण्यासाठी वेळ असताना पर्यटकांची पावले अगदी सहज याठिकाणी असणाऱ्या सेल्फी फलकाकडे वळत होती. इथे आल्याची आठवण म्हणून सर्वच पर्यटकांना आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही. परंतु काही दिवसांपूर्वी हा सेल्फी फलक काढण्यात आल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरच सेल्फी फलक लावावा अशी पर्यटकांमधून मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *