मुंबईतील वरळी येथे आजपसून होणाऱ्या पहिल्या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. वरळीकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडू्नच्या खेळाची मेजवानी पुढील चार दिवस मिळणार.
मुंबई :- ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ एप्रिलला सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा संध्याकाळी ६ ते १० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेची तयारी जोमाने सुरु असून स्पर्धेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून ओम् ज्ञानदीप मंडळाचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.
पुरुष व्यावसायिक गट विभागणी :-
१) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोष्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्.
२) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.
३) क गट :- १) मुंबई बंदर, २)डी. पी. यु.-पुणे, ३)मुंबई महानगर पालिका.
४) ड गट :- १) मध्य रेल्वे, २)मिडलाईन-रायगड, ३) रूपाली ज्वेलस.
५) इ गट :- १)एच. ए. एल.-नाशिक, २) मीरा-भाईंदर महानगर पालिका, ३) जे. जे. रुग्णालय.
६) फ गट :- १) ठाणे महानगर पालिका, २) युनियन बंक, ३) हिंदुजा रुग्णालय.
अधिक माहिती करता जितेश शिरवाडकर ८८५०८३४९०६ किंवा सुनील करंबळे ९८९२१४६८२८.
