माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शुभम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगरसेवक सचिन दाभेकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कर्जत येथील नेत्रचिकित्सक उपस्थित होते. कुणाला मोतीबिंदू असल्यास त्यांना पनवेल येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.दिवसभरात तीनशेहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला असून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता रांजाणे,रिझवाना शेख, सोनम दाभेकर,वर्षा शिंदे, उद्योजिका रेखा चौधरी, मनीषा शिंदे, अर्चना कदम, शुभांगी शिंदे,गीता जाधव,कामिनी शिंदे यांसह नगरसेवक सीताराम कुंभार, सोहेल महापुळे,सचिन दाभेकर  आदी उपस्थित होते.
अनिल गायकवाड,प्रशांत गायकवाड, श्रेयस गायकवाड, शेखर गायकवाड,शुभम गायकवाड, अनिल नाईकडे, सुशांत नाईकडे,रुपेश गायकवाड, राजा बल्लाळ, पांडुरंग सोनावळे,किशोर सोनवळे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *