वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

 

मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसय यांनी वराह पालन योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनाचा समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार  वराह खरेदीसाठी शासन ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. तर, कुक्कुटपालन व मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी ही  टक्के व्याज सवलत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *