नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे ६० व्या सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेला आज सकाळी ९ वाजता सांघिक गटांच्या सामान्यांनी सुरुवात झाली. तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय एस. पाटील व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय आर. पाटील, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार तसेच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व राज्य कॅरम संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सांघिक पुरुष गटांच्या पहिल्या सामन्यांचे निकाल पुढील प्रमाणे.
मुंबई वि वि पालघर ३-०
पुणे वि वि रायगड ३-०
मुंबई उपनगर वि वि धुळे २-१
ठाणे वि वि कोल्हापूर ३-०
सांघिक महिला गटांच्या पहिल्या सामन्यांचे निकाल पुढील प्रमाणे.
मुंबई वि वि रत्नागिरी ३-०
ठाणे वि वि पुणे ३.०
मुंबई उपनगर वि वि पालघर ३-०
पुरुष वयस्कर एकेरी गटाचे निकाल पुढील प्रमाणे.
शांतीलाल जितिया ( मुंबई ) वि वि गोविंद जवळकर ( ठाणे ) १८-१२, २५-०
अल्ताफ मुजावर ( पुणे ) वि वि अशोक सावंत ( मुंबई ) २५-२, २५-६
सुनील गुरव ( रायगड ) वि वि अनिल सोनावणे ( मुंबई उपनगर ) ८-२४, २४-१०, २५-२३
अशोक जाधव ( पुणे ) वि वि दीपक गमरे ( मुंबई उपनगर ) २०-७, १५-१८, २५-२
प्रकाश सोनावणे ( ठाणे ) वि वि अनंत सुर्वे ( मुंबई ) २२-१९, २५-१८
संतोष निमकर ( पुणे ) वि वि उदय बने ( मुंबई उपनगर ) २५-२२, २५-१०
झहीर सय्यद ( ठाणे ) वि वि जीवराज गोहिल ( मुंबई उपनगर ) २१-२०, ११-२५, २०-१९
किशोर वागले ( मुंबई ) वि वि व्हिक्टर मेनेझेस ( ठाणे ) २५-१२, ७-२५, २५-११
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *