“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन
जयंत चाचरकर यांची माहिती
अशोक गायकवाड
अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी
