मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता बागेश्री साने आणि कृष्णा बोंगाणे यांच्या गायनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बागेश्री साने यांना यावेळी भूषण परचुरे तबला तर विनोद पडगे संवादिनीवर साथ देतील. कृष्णा बोंगाणे यांना तेजोवृत्त जोशी हे तबला तर ओंकार अग्निहोत्री संवादिनीवर साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.