अशोक गायकवाड
रायगड : महानगर पालिका व जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे*
मुलभूत पात्रता :- महानगर पालिका व जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा , विद्यार्थी धनगर समाजालीत असावा ,जात प्रमाणपत्र बंधनकारक राहील , उत्पन मर्यादा २.५० लाखाची असेल, शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी त्याच शहरातील रहिवाशी नसावा शैक्षणिक निकष :- सदर विद्यार्थ्याला १२ वी मध्ये किमान ६० गुण मिळालेले असावे व उच्च शिक्षण घेत असावा , योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. महाविद्यालयीन उपस्थिती ६० टक्के असावी, विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल, निवड झालेल्या विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पात्र राहील मात्र प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणे बंधनकारक. या योजनेचा लाभ ५ वर्ष लाभ घेता येईल, विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे, सदर विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून मंजूर झाला आहे त्यानुसार अनुज्ञेय राहील. लाभाचे स्वरूप :- रायगड जिल्ह्यामधील पनवेल महानगरपालिका अंतर्गत सदर विद्यार्थ्याला भोजन भत्ता २८ हजार, निवास भत्ता, १५ हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार लाभ दिला जातो.
००००