भाजप आमदार अमीत साटम यांच्या उडान या पुस्तक प्रकाशन प्रसंगी वक्तव्य*
स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल करियर निवडीबाबत एक व्यावहारिक पुस्तक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत*
पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर न थोपवता त्यांनी संरक्षक कवच बनून मुलांना करियर निवड करण्यास मदत करावी – साटम
साटम यांच्या उडान या पुस्तकाचे भागवत यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई: आपली आवड जर आपण करियर म्हणून निवडली तर निश्चितपणे आयुष्यात यश मिळत. मात्र जर एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीच आवड असेल आणि ते मुख्यामंत्री झाले तर तिथे प्रोब्लेम होतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. फडणवीस हे अंधेरी पश्चिम’चे भाजप आमदार अमीत साटम यांनी खास युवकांसाठी लिहिलेल्या ‘उडान’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी बोलता होतो. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि डॉ शरद म्हैसकर प्र-कुलगुरू, NMIMS विद्यापीठ यावेळी उपस्थित होतो.
सरसंघचालक मोहन भागवत यांचे हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. विध्यार्थ्यानी करियर निवड कशी करावी याबाबत स्वानुभवातून आलेल्या गोष्टींवर विस्तृत विवेचन साटम यांनी या पुस्तकात केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी सांगितले कि निश्चितपणे ह्या पुस्तकतून येणाऱ्या युवा पिढीला दिशा देण्याचं काम होईल. आपली आवड करियर म्हणून निवड केल्यास आयुष्यत निश्चितपणे यश मिळत. एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीच आवड असेल आणि ते मुख्यामंत्री झाले तर तिथे प्रोब्लेम होतो, असं फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.
राजकीय प्रवासात त्यांना आलेले अनुभव जगले आहेत त्या अनुभवातून त्यांना जे शिक्षण मिळाले आहे ते मांडणी केल्यामुळे हे पुस्तक वास्तववादी वाटते, अशी टिपण्णी फडणवीस यांनी केली.
एक राजकारणी म्हणून साटम आक्रमक दिसतात. मात्र त्याचवेळेला कौटुंबिक बाबतीत शांत असताना दिसतात. आमदार म्हणून विषयांवर बोलताना खूप कमी लोकांना त्या विषयाची पूर्ण समज असते. जी ३-४ नावे आमच्या डोळ्यासमोर येतात त्यात साटम आहेत. कारण ते पूर्ण संशोधन करून विषयाच्या खोलात जातात आणि परिणामकारक आणि प्रभावीपणे ते विषयाची मांडणी करतात, असे फडणवीस पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले कि हे स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल करियर निवडीबाबत एक व्यावहारिक पुस्तक आहे. करियर म्हणजे परीक्षेत चांगले मार्क्स आणि नोकरीत चांगला पगार आहे असं झालं आहे. मात्र ते बरोबर नाही. केवळ यशस्वी होण्याला करियर म्हणता येत नाही. जी आवड आहे त्याला करियर बनविणे ह्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. पुस्तकाचं शीर्षक अतिशय योग्य आहे. समाजाचं आंधळेपणाने अनुकरण करू नये, असे ते म्हणाले.
हे पुस्तक इंग्रजीत लिहिलं असली तरी भारतातील अधिकाधिक भाषांमध्ये त्याच भाषांतर करून जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साटम यांनी यावेळी पुस्तक लिहिण्यामागचा भूमिका विशद करताना सांगितले कि पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर न थोपवता त्यांनी संरक्षक कवच बनून मुलाचं रक्षण करून त्यांची आवड त्यांना करियर म्हणून निवडण्यास मदत करावी. मी माझ्या आयुष्यात जे अनुभवले, ते ह्या पुस्तकात टिपले आहे. माझा कॉर्पोरट क्षेत्रातील अनुभव ते जनसेवा आणि समाजसेवा यात आहे. आपली आवड हीच करियर बनविणे म्हणजे सोमवार ते रविवार या नित्यक्रमातून बाहेर पडणे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
00000