अशोक गायकवाड
नवी मुंबई : आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून पिणे, घरातूनच कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण करुन घंटागाडीत वेगवेगळा देणे आणि परिसर स्वच्छ राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे अशा शब्दात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचा शुभारंभ वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रुग्णालयात महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाला.
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध असून आपल्या घराप्रमाणेच आपला परिसरही स्वच्छ राहील याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. विशेषत्वाने पावसाळी कालावधीत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून पिणे, घरातूनच कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण करुन घंटागाडीत वेगवेगळा देणे आणि परिसर स्वच्छ राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे अशा शब्दात नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत् ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचा शुभारंभ वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रुग्णालयात महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी ते मनोगत व्यक्त् करीत होते. पावसाळी कालावधीत डासांमुळे मलेरिया व डेंग्यू सारखे आजार होतात. त्यामुळे डास उत्पत्ती रोखण्यासाठी आपण पाणी साचून डास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे होणारे अतिसारासारखे आजार रोखण्यासाठी शुध्द पाणी पिण्याची आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. यादृष्टीने केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेले ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असून त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन आयुक्तांनी केले.याप्रसंगी बोलताना अतिरिक्त् आयुक्त् सुनिल पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेसाठी व आरोग्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगत नागरिकांनी याकामी सक्रीय सहभागी व्हावे असे सांगितले.स्वच्छ नवी मुंबई मिशनचे युथ आयकॉन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी सागरी जलतरण करताना काही वर्षांमध्ये समुद्रातील पाण्याच्या वाढलेल्या तापमानाचे उदाहरण देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी सजग होऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी महानगरपालिकेने जून महिन्यातच पावसाळी आजारांच्या अनुषंगाने नागरी आरोग्य केंद्रांमार्फत सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली व ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत आरोग्य विषयक व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाईल असे सांगितले.आजच्या डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ. अजय गडदे, वैदयकीय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे व डॉ. उध्दव खिल्लारे तसेच इतर डॉक्टर्सना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.आरंभ क्रिएशन्सच्या कलावंतांनी सादर केलेल्या पथनाटयाव्दारे स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश मनोरंजातून प्रबोधनात्मक स्वरुपात मांडण्यात आला. आयुक्त महोदयांचया शुभहस्ते या कलावंतांचाही सत्कार करण्यात आला.
०००००