स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन केले रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा आला अनुभव
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पहायला मिळाला. आज दुपारी ठाणे येथून विधान भवनाकडे येत असताना घाटकोपर नजीक दोन जैन साध्वीनचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून गेले.
सकाळी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर रोड पाशी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला असता मुख्यमंत्र्यांना हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. प्रचंड वेगात असूनही मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलांच्या मदतीसाठी धावून गेले. या जैन साध्वीची गाडी उलटल्याने त्यांना दुखापत झाल्याचे त्याना समजले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या कोंव्होय मधील रुग्णवाहिका पुढे बोलावून त्याना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच त्याठिकाणी तैनात असलेल्या महिला पोलीस आणि वाहतूक पोलिसांना त्यांच्यासोबत जाऊन त्याना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी पदाचा बडेजाव सोडून गरजेला धावून जाण्याचा आपला बाणा कायम ठेवल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. नुसतं अर्थसंकल्पात तरतूद करणे आणि होर्डिंग लावणे एव्हढ्यापुरताच नव्हे तर प्रत्यक्ष गरज पडेल तेव्हा मदतीला धावून जाणारा भाऊराया मुख्यमंत्र्यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले.
०००००