अनिल परब, अभ्यंकर विजयी
कोकणात भाजपाचे डावखरे विजयी
अशोक गायकवाड
मुंबई : मुबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या दोन्ही जागा जिंकत मुंबईत आवाज ठाकरे सेनेचाच असणार हे लोकसभेनंतर पुन्हा एकदा दाखवून दिले. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. मुंबईचा शिक्षक मतदार संघर्ष ठाकरे सेनेने कपिल पाटील याच्या शिक्षक भारताकडून खेचून आणला. ठाकरे सेनेचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी झाले .
अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते.
मुंबईत फक्त आमचंच चालणार
विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष लढले त्यांचा आभारी आहे.
मुंबई फक्त शिवसेनेचीच असल्याचं सांगत अनिल परब म्हणाले की, ‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ हे सिद्ध झालं आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभार आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघाचा निकाल
) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)*
2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
3) योगेश बालकदास गजभिये :- 89
4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11
6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26
8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल
1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- 28 हजार 585
3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
4) अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141