मुंबई :  मुख्यमंत्री लाडकी बही  योजनेच्या नोंदणीसाठी राज्यभरात महिलांसाठी तुफान गर्दी केली. महिलांना  १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरु झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हातील सेतू केंद्रात तुफान गर्दी केले आहे. सोलापूरअकोला, मालेगाव, नंदुरबार यासह अनेक ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री ‘ माझी लाडकी बहिण ‘ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून वय वर्ष  21 ते 60  दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500  रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याला आजपासून सुरुवात झाली असून जिल्हाभरातील सर्वच सेतू व तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी उसळलेली पहायला मिळाली आहे..नाशिकच्या मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयात सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी लगाणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली..या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवाशी दाखला, उत्त्पन्न दाखलासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *