ठाणे, पहिल्या पसंतीची १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ४२ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १ लाख ३२ हजार ७१ मते वैध ठरली तर ११ हजार २२६ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ६६ हजार ३६ इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
१ निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- १ लाख ८१९
२ कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- २८ हजार ५८५
३ विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- ५३६
४ अमोल अनंत पवार, अपक्ष :- २००
५ अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- ३१०
६ अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- ३०२
७ गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- ४२४
८ जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- ६४
९ नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- २१५
१० प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- ३३
११ मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- २०८
१२ ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- ३३४
१३ श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- १४१
00000
