ठाणे : जागतिक पर्यारण दिनानिमित्त विप्रमंचे टीएमसी विधी महाविद्यालयात, ठाणे महानगरालिका आणि बांदोडकर विज्ञान महावद्यालय ठाणे तसेच 1महाराष्ट्र NCC Army Boys बटालियन, यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त, विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठाणे महानरपालिके तील तीन मान्यवर , उपायुक कदम मॅडम, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डॉ. मनीषा प्रधान मॅडम तसेच श्री. आकाश जगताप यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह प्राचार्या डॉ. विंदा मांजरामकर, प्राचार्य बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, टीएमसी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. राजू जाधव (निवृत्त) आणि १महाराष्ट् एनसीसी बटालियन चे एनसीसी ऑफिसर, कॅ. बिपिन धुमाळे
यावेळी २१० एनसीसी व इतर विभागाच्या च्या विद्यार्थ्यानी वृक्षारोपणात मदत करून पर्यावरणाविषयी त्यांची बांधिलकी दाखवून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणीय शाश्वततेला चालना देणे आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. नायक यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि हरित भविष्य घडवण्यासाठी शैक्षणिक संस्था काय भूमिका बजावू शकतात यावर प्रकाश टाकला. व वृक्षारोपण करून झाडे वाचवा पर्यावरण वाचवा व वृक्षावर प्रेम करा असा संदेश डॉ.विंदा मंजरमकर यांनी दिला यानंतर ठाणे महानरपालिकेच्या उपायुक्त कदम मॅडम, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या डॉ. मनीषा प्रधान ही विद्यार्थ्यांना संबोधित करताना केवळ झाडे लावणेच नव्हे तर त्याचे संवर्धन करण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी हिरवेगार, उज्वल आणि निरोगी भविष्याच्या सकारात्मक आशेने महाविद्यालयाच्या आवारात रोपटे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेवटी प्रा.डॉ . इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले.
०००००
