मुंबई : ४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी रुपये १,०००/= प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे

१४ वर्षा खालील ( सब ज्युनिअर गट ) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने

१२ वर्षां खालील ( कॅडेट गट ) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन ( नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक )

१४ वर्षा खालील ( सब जुनिअर गट ) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर

१२ वर्षा खालील ( कॅडेट गट ) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे ( माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक )

अरुण केदार

मानद सचिव

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *