उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्टाईलला स्टाईलने जवाब

सातारा : महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांची दमछाक होत असतानाच शरद पवार यानी उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात थेट साताऱ्यात उदयनराजेंच्या स्टाईलला स्टाईने जबाव देत जबरदस्त हशा आणि टाळ्या वसूल केल्या.

घडले ते असे… गेले काही दिवस उदयनराजे दिल्लीत मुक्कामी होते. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते, असा दावा केला जात होता. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे काहीही बोलणे झालेले नाही, असे पवार यांनी सांगितले. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही हातांनी उदयन राजेंसारकी थाटात कॉलर उडवली. पवारांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनादेखील हसू आवरले नाही. आजच्या त्यांच्या या अक्शनने साताऱ्याचा हिरो कौन ? शरद पवार हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

याच साताऱ्यात गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीत भर पावसात शरद पवारांनी सभा घेत उदयन राजेंचा पराभव केला होता. त्यांच्याविरोधात श्रीनिवास पवार यांना उमेदवारी देत जिंकून आणले होते.

मात्र यंदा या मतदारसंघातील मविआचे उमेदवार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना पाटलांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी दोन हात कोण दोन हात करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साताऱ्यातून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना लोकसभेची उमेदवारी देण्याचाही विचार होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *