ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उप विभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उप आयुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, एमएमआरडीए कार्यकारी अभियंता श्री.किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी. कामे पूर्ण करीत असताना वाहतूकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
00000