आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिन-१५ जुलै रोजी होणाऱ्या कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी शालेय १२ संघात चुरस होईल. रोझरी हायस्कूल विरुध्द समता हायस्कूल-घाटकोपर यामधील स्पर्धेची उद्घाटनीय लढत आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, रोझरी हायस्कूलचे फादर नाईजील बॅरेट व प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व अध्यक्ष लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. डॉकयार्ड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात मॅटवर ही स्पर्धा टायब्रेकरसाठी होणाऱ्या ५-५ चढायांमध्ये रंगणार आहे.

 

प्रतिष्ठेचा कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक पटकाविण्यासाठी अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, सावित्रीबाई फुले शाळा-घाटकोपर, अफॅक हायस्कूल-चेंबूर, सेंट जोसेफ हायस्कूल-उमरखाडी, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सेंट मेरी हायस्कूल-माझगाव, रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड आदी संघांमध्ये चुरस असेल. प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक मोझेस लोपेस व राम गुडमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींचे स्पर्धेदरम्यान शालेय खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे प्रायोगिक स्वरूपातील इंडोर कबड्डी स्पर्धेमधील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार व वैयक्तिक पदके दिली जाणार आहेत. विजेत्या पहिल्या दोन संघांना आत्माराम मोरे शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाईल.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *