मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरु असलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २३-६, १९-२३ व २५-१३ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मुंबईच्या पंकज पवारने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर तीन सेटमध्ये ४-२५, १४-१३, १६-१३ असा निसटता विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.

संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि अशोक गौर ( मुंबई ) २५-५, २१-७

प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २१-५, २१-१५

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

प्राजक्ता नारायणकर ( मुंबईत उपनगर ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ५-१६, २५-६, २५-५

समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि मेधा मठकरी ( पुणे ) २५-०, २५-०

श्रुती सोनावणे ( पालघर ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) १५-१०, २५-२२

काजल कुमारी ( मुंबई ) वि वि आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) २५-१२, २४-१३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *