उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यात
महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांचा उपक्रम

 

 

 

दिवा :- दिवा शहरातील गरजू नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने मोफत धान्य वाटप व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवा शहरातील आकांक्षा हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने गरजू नागरिकांना धान्यवाटप व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा उपक्रम आयोजित केला होता.
आकांक्षा हॉल बी आर नगर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली दरेकर, विधानसभा महिला संघटीका योगिता नाईक शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर,उपशहर प्रमुख,महिला समन्वयक प्रियंका सावंत उपशहर संघटिका स्मिता जाधव प्रमुख त्याचबरोबर विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख, गटप्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला आघाडीच्या वतीने गरजू महिलांना नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आयोजित करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्य जनतेची ज्या पध्दतीने काळजी घेतली त्यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव साहेबांना दीर्घायुष्य मिळावे अशी तमाम जनतेची भावना असल्याचे ज्योती पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *