सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवारी
ठाणे : सुधागड तालुक्याच्या व तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणारी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवार 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल घाडगे यांचे अध्यक्षतेखाली सहयोग मंदिर, घंटाळी रोड, ठाणे येथे आयोजित केला आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी व तालुकावासीयांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदा दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांना ‘सुधागड मित्र’ पुरस्काराने तर सुधागडातील ज्येष्ठ समाजसेवक आत्माराम खरीवले यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार व आर्किक्टेटची पदवी प्राप्त केलेल्या कु. पूर्वा दिपक दळवी हिचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, सुधागड मित्र, (मार्गदर्शक) विजय तांबे, सुरेश मेश्राम, सुधागडमित्र तथा समाजसेवक विजय सागळे, उद्योजक तथा समाजसेवक अंजली व वसंत केळकर, सुधागड तालुका मराठा समाज कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित सदाशिव बारस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी, बारावी आणि उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांचे स्वागत, विशेष पुरस्कारने सन्मानित मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत आर्थिक मदतीचे वितरण, इ. 1 ते 9वी विशेष गुण संपादत विद्यार्थी बक्षिस वितरण, पदवीधर (डीग्री) परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण, 2024-25 या शैक्षणिक वर्षात सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील पितृछत्र हरपलेल्या दिव्यांग व गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक फी, शालयेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने सुधागडातील आत्मोन्नती विद्यालय जांभुळपाडा, प्र. ठाकरे विद्यालय माणगाव बुद्रुक, प्रा. गांवड विद्यालय परळी, माध्यमिक विद्यालय चंदरगाव, जागृती हायस्कूल नाडसूर, शारदा विद्यामंदीर पेडली, स्वामी विवेकानंद हायस्कूल मजरे जांभुळपाडा, माध्यमिक विद्यालय वाघोशी, माध्यमिक विद्यालय खवली, संत नामदेव हायस्कूल नांदगाव, कोंडजाई हायस्कूल नागशेत, माध्यमिक विद्यालय पाच्छापूर, बल्लाळ विनायक विद्यालय पाली, ग. बा. वडेर हायस्कूल पाली. आदी शाळांना शैक्षणिक, क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच सुधागड तालुका रहिवासी संघाच्यावतीने वधु-वर सुचक केंद्रही कार्यालयात सुरू असून सुधागड तालुक्यासह ठाणे, पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बांधवांना नाव नोंंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. ङ्गसंस्थेच्या वरील उपक्रमासाठी अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सरचिटणीस राजू पातेरे, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, संपर्कप्रमुख सुनिल तिडके, अंतर्गत हिशेब तपासनीस दत्ता सागळे, सांस्कृतिकप्रमुख जनार्दन घोंगे, उपसांस्कृतिकप्रमुख रघुनाथ इंदुलकर, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, सल्लागार विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, सुधीर मांढरे, गणपत डिगे, सुरेश शिंदे, रमेश सागळे, चंद्रकांत बेलोसे, अनिल सागळे, हरिश्चंद्र मालुसरे, गजानन जंगम, मोहन भोईर, श्याम बगडे, भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, बबन चव्हाण, जयगणेश दळवी, सखाराम खामकर, प्रकाश वाघमारे, दत्तात्रय दळवी, राजेश बामणे, राहुल लहाने, प्रवीण बामणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
00000