ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांमधून पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी समक्ष अर्ज मागविण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.
एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त शिक्षक नेमणूका या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत करण्यात येत आहेत. उमेदवाराचे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त असलेले शिक्षक, कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. मासिक मानधन रुपये २०,०००/- प्रतिमाह (इतर कोणतेही लाभाव्यतिरिक्त) दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज २६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) ठाणे जिल्हयातील आपल्या लगतच्या / सोयीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात जमा करावेत. तसेच अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद ठाणेच्या https://zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *