माथेरान : माथेरान मध्ये दरवर्षी शेकडो झाडे अतिवृष्टीमुळे उन्मळून पडत असतात याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसून येत आहे. याकामी वृक्षारोपण ही काळाची गरज लक्षात घेऊन माथेरान मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रगण्य कोकणवासीय समाज संस्था यांनी पेमास्टर गार्डन या भागात दि २५ जुलै रोजी विविध फळा फुलांची रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व रोपे वन विभागाच्या माध्यमातून मोफत देण्यात आली तर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी वर्ग या कामात सहभागी होता. कोकणवासीय समाज संस्था हे नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य करत असतात.त्यातच वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून या संस्थेच्या माध्यमातून भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी या भव्य कार्यक्रमात समाजाच्या महिला वर्गासह पुरुष मंडळींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी संस्थेचे नवोदित अध्यक्ष चंद्रकांत सुतार, माजी अध्यक्ष शैलेंद्र दळवी, भालचंद्र सावंत दत्ता सनगरे, नितीन सावंत ,ललित पांगसे, विजय सनगरे निलेश मढे, शेखर चव्हाण, महिला अध्यक्ष सारिका पाटील, पौर्णिमा जाबरे,रिया दळवी, स्वाती कुमार, श्रद्धा मढे, परेंदू मोरे यांसह अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.