ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कमेचा महिनाभरात हिशोब तपासून अदा करण्याचे महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले असल्याची माहिती महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे.
२४ फेब्रुवारी २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन, भत्ते लागू केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेने २०१५ ते २०२३ पर्यंत फरकाची थकीत रक्कम सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा हिशोब महिन्याभरात तपासून अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन श्रमिक जनता संघाचे शिष्टमंडळाला आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी बैठकीत दिले.
जे कामगार वयोमानानुसार कामावरून कमी करण्यात आले आहे त्यांना नियमानुसार उपदानाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले. कामगारांच्या वेतनातून ठेकेदार मेसर्स सिक्युअर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून बेकायदेशीर कपात करण्यात येत असल्याची बाब लक्षात आणून देण्यात आली तसेच पगारातून दरमहा PPE च्या नावाखाली वेतनातून कपात करण्यात येणारे हजारो रुपये कोणत्या कारणासाठी कपात केली जाते? यांचे स्पष्टीकरण मिळावे अशी भूमिका युनियन तर्फे मांडल्यानंतर सदर प्रकरणी ताबडतोब चौकशी करून अहवाल सादर करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला. काम करूनही वेतन अदा न केलेल्या कामगारांची हजेरीचे रिकार्ड तपासून योग्य असल्यास वेतन अदा करण्यात येईल. या व इतर प्रलंबित मागण्यांकडे युनियन तर्फे महापालिका प्रशासनाचे लक्ष या वेळी वेधण्यात आले. युनियनच्या स्थानिक कामगार प्रतिनिधींशी प्रशासन संपर्क साधून विविध समस्या सोडविण्यासाठी सूचना आयुक्त यांनी दिली. कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयुक्तांचे दालनात आयोजित बैठकीत महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त श्री प्रल्हाद रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. गाडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे श्री.वसंत देगलूरकर आणि श्रमिक जनता संघ युनियन तर्फे महासचिव जगदीश खैरालिया, सचिव सुनील कंद आणि कामगार प्रतिनिधी बापू ओव्हाळ, समीर दरेकर, आणि राजू धायफुले आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *