२०वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

मनाली रत्नोजी स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मुंबई : पंचकुला, हरयाणा येथे आज संपन्न झालेल्या २०व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिस-या वर्षी महाराष्ट्राने या प्रकारामधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सर्वसाधारण विजेतेपदाची “हॅटट्रीक” साधली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकपट्टूंनी ६ सुवर्ण ४ रौप्य अशी एकूण १० पदके पटकावताना ४८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १ सुवर्ण ८ रौप्य आणि एक कांस्यपदकासह ३७ गुण मिळवून कर्नाटकास या स्पर्धेमधील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत नाशिक दुर्गम भागातील योगेश सोनावने याने तीन सुवर्ण पदके आणि पुण्याची मनाली रत्नोजी हिने महिला ज्युनिअर गटात २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटाकावताना महाराष्ट्राच्या विजयात मोवाची कामगिरी केली. मनालीने स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान मिळवला.

काल शेवटच्या दिवशी नाशिकच्या ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट गटात एक्ससीओ (क्रॉस कंट्री ऑलल्पिक) प्रकारात १ ता. ३२ मि ४२.८११ से. वेळ देत सुवर्णपदकावर आपला ठसा उमटवला. कर्नाटकच्या स्टार नारझरी हिना १ ता. ३५ मि. ४४.६४७ से. वेळ नोंदवताना रौप्यपदक तर उत्तराखंडच्या सुनिता श्रेष्ट हिने १ ता. ३८ मि. ४६.१४२ से. वेळ देत कांस्पदक मिळवले. ऑक्टोबर २०२३ मध्ये केरळ येथे झालेल्या आशियाई एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऋतिका गायकवाड, मनाली रत्नोजी यांनी भारताचे प्रतिनीधीत्व केले होते. महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंकडून पदक विजेती कामगिरी करुन घेण्यात सलग पाच वर्षे प्रशिक्षकापदाची जबाबदारी सांभाळणा-या बिरु भोजने यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्राचे अध्यक्ष अड विक्रम रोठे, उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव प्रा. संजय साठे, आश्रयदाते विजय जाधव, खजिनदार भिकन अंबे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *