उल्हासनगर : ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियांना अंतर्गत डपिंग ग्राउंड परिसरात मान्सूनमध्ये होणाऱ्या आजाराला आळा घालण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ अझीझ शेख यांच्या आदेशानुसार शंकर मंदिर पाण्याच्या टाकीजवळ खड़ी मशीन गायकवाडपाडा कॅंप ५ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यांत आले .या शिबीराचा अनेक नागरिकानी लाभ घेतला आहे.
उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉ . किशोर गवस उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, श्री मनिष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय विभागाच्या डॉ.जोस्ना मोरे यांनी त्याच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने आरोग्य शिबीर संपन्न झाले. सदर अभियानात डम्पिंग ग्राउंड परिसरातील महात्मा फुले नगर, बंजारा कॉलनी, विठ्ठल कॉलनी, नाशना कॉलनी आदी कॉलनीतील नागरिकांनी आरोग्य तपासण्या करून घेतल्या. या मोहिमेत जळपास ६० पेक्षा जास्त महिला व पुरुषांनी तपासण्या करून शिबिराचा लाभ घेतला.
नियंत्रक दिपक भोये, डम्पिंग इन्चार्ज राजू निकाळजे यांनी परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले. यावेळी माजी नगरसेवक किशोर वनवारी, माजी नगरसेवक सुरेश गायकवाड, दिपक गायकवाड व परिसरातील अनेक नागरिकानी सहभाग नोंदवला आहे. तसेच जवळपास ७०-८० कर्मचाऱ्यानी डम्पिंग ग्राउंड परिसरान स्वच्छता माहीम राबवुन १० स्प्रे पंप व फॉग मशीनद्वारे परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
दरम्यान आयुक्त डॉ. अझीझ शेख यांच्या हस्ते नुकतेच दूर्गापाडा येथे नवीन हेल्थ पोस्ट चे उद्घाटन करून परिसरातील नागरिकांसाठी मुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या असुन या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी तेथील स्थानिक नागरिकांना केले आहे.
