रमेश औताडे

 

 

मुंबई
सर्वांसाठी घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या योजनेतून सर्वसामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे म्हणून मी म्हाडा, शासनाचे संबंधित विभाग, स्थानिक पालिका यंत्रणा, महसूल विभाग आदी सर्व यंत्रणेला सोबत घेऊन गृह प्रकल्प सुरू केला आहे.
मात्र काहीजण स्वस्तात घरे देऊ नकोस म्हणून मला धमकावत आहेत. याबाबत मी संबंधित सर्व पोलीस विभागाला रितसर तक्रार दिली आहे. गोरगरीब जनतेचा आशीर्वाद मला मिळतोय म्हणून मी त्यांच्यासाठी स्वस्तात घरे बांधत आहे. असे मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत चड्डा डेव्हलपर अँड प्रमोटर प्रा.लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक डिंपल चड्डा यांनी शुक्रवारी दिली.
पंतप्रधान गृह योजना मार्फत मी बदलापूर वांगणी येथे गृह प्रकल्प सुरू केले आहे. म्हाडा व सरकारी सर्व विभागाला याबाबत सर्व कागदपत्र, अटी शर्ती पूर्ण करून झाल्यानंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोत्साहन दिले. गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मला सांगितले आहे. असे सर्व रितसर सुरू असताना मला काही विरोधक नाहक त्रास देत आहेत. स्वस्तात घरे बांधू नकोस म्हणून मला धमकावत आहेत. या पार्श्वभूमीवर मी पत्रकार परिषद घेत माझी बाजू मांडत आहे असे चड्डा यांनी यावेळी सांगितले.
गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला स्वस्तात घरे बांधण्यासाठी बळ मिळत आहे. कोरोना काळात अनेक जण बेरोजगार झाले. त्यांना आज हक्काचे घर नाही. बँका त्यांचा सिबील स्कोअर पाहून जास्त लोन देत नाहीत. त्यामुळे मी, म्हाडा व सरकार तिघेजण माझ्या जमिनीवर कर्ज काढून हा प्रकल्प पूर्ण करत आहे. जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला स्वस्तात घर मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असे चड्डा यांनी यावेळी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *