सततधार पावसामुळे रस्ते आणि पुल पाण्याखाली
राजीव चंदने
मुरबाड : गेले दोन तीन दिवस सततधार कोसळणाऱ्या वरुण राज्यामुळे मुरबाड कल्याण मार्गावरील किशोर, या गावाजवळ पाणी साचल्याने मुरबाड कल्याण मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले तर घोरले.हेदवली,व पाडाळे,चिखले या मार्गावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने अनेक गावचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांनी प्रशासनाचे उदासीनतेचा निषेध व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईचे ग्रहण वर्षानुवर्षे सुटत नाही त्यात रस्त्यांची समस्या सोडविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने किरकोळ पावसात रस्ते पाण्याखाली जातात तर घोरले,नांदेणी,चिखले,हेदवली,पाडाळे.ठुणे या रस्त्यांना जोडणारे पुल पाण्याखाली जात आहेत.या रस्त्यावर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतो.परंतु रस्त्याची उंची वाढत नसल्यामुळे ते पाण्याखाली जातात.तर घोरले,हेदवली,चिखले,हे पुल पाण्याखाली जात असल्याने परिसरातील नागरिकांचा तालुक्यातील संपर्क तुटतो.यावर प्रशासन थातुरमातुर कार्यवाही करणे मात्र हे पुल नव्याने बांधण्यात यावे असा एकदाही विचार केला नसल्याने मुरबाड करांची या नैसर्गिक समस्येतुन सुटका होणार केव्हा हा असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
तालुक्यात दोन तीन दिवस जोरदार पाऊस असुन त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी प्रत्येक सजातील तलाठी तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र सतर्क ठेवण्यात आले आहे – संदिप आवारी.तहसिलदार मुरबाड.
००००
