संदीप चव्हाण

 

 

पॅरिस : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आयफेल टॉवरच्या साक्षिने जिद्द आणि उत्साहाचा महाउत्सव असणआऱ्या ३३ व्या ऑलिम्पिकचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला. अवघ्या जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा महामंत्र देणाऱ्या फ्रान्सच्या राजधानीत उद्घाटन सोहळाही समतेची साक्ष देणारा होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा हा स्टेडियमबाहेर आयोजित करण्यात आला. मोकळ्या आकाशाखाली लाखो लोकांनी या उद्घाटनाचा सोहळा अनुभवला

फ्रान्साचा युवा डायरेक्टर थॉमस जोली याच्या संकल्पनेतून हा दिमाखदार सोहळा साकारला होता. तब्बल २००० कलाकारांचा समावेश असलेल्या या सोहळ्यासाठी २०० दिवस सराव सुरु होता. जगभरातून तब्बल १०५०० खेळाडू आणि पदाधिकारी या सोहळ्यात सहभागी झाले होते. मानवी क्षमतेचा कस लावणाऱ्या या ऑलिम्पिक सोहळ्यात विविध देशातील खेळाडूंनी त्यांच्या पारंपारिक वेशभुषेचे प्रदर्शन संचलनात केले. खेळाडूंच्या या संचलनासाठी आयफेल टॉवरसमोरील सेन नदीत ८५ विशेष बोटींची व्यवस्था केली होती.

आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात ज्या भुमीवरून झाली त्या ग्रीस देशांचे खेळाडू प्रथेनुसार परेडमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. भारतीय खेळाडूंचा या परेडमधिल क्रमांक होता ८४ वा. शरथ कमल आणि पीव्हि सिंधू हे भारतीय पथकाचे ध्वजधारक होते. १२ क्रीडा प्रकारातील एकुण ७८ खेळाडू आणि पदाधिकारी या संचलनात सहभागी झाले होते. भारताचे अथलेटिक्स, वेटलिफ्टींग आणि कुस्तीचे खेळाडू अद्याप पॅरिसमध्ये दाखल झालेले नाहीत.

शनिवारी भारताचे नेमबाज पदकांसाठी झुंजतील. शनिवारी मॅचेस असल्यामुळे नेमबाज या संचलनात सहभागी झाले नव्हते. यंदा नेमबाजांकडून भारताला पदकांच्या अपेक्षा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *