रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियनऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी एस ई -इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते.
या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेड चे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने , बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा.संगीता तिवारी यांचा समावेश होता.
(डावीकडून) डॉ.निशीता राजे प्रकाश कुलकर्णी आणि उदय तारदाळकर.
000
