ठाणे : मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील १७७४ प्रलंबित दावे लोक अदालत मध्ये निकाली काढण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे आणि जेष्ठ विधीज्ञ सुनील रवानी यांच्या द्वीपॅनल ही कामगिरी केली. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (ता.२७) राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती.
न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमी करण्यासाठी न्यायालयांमध्ये वर्षाला चार लोक अदालत भरविल्या जातात. ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी या वर्षाची दुसरी लोक अदालत २७ जुलैला भरवण्यात आली होती. ठाणे न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुध्दा तडजोडीतून प्रकरणे मिटवण्यासाठी ठेवण्यात आले होते. पैकी १७७४ दावे पक्षकारांच्या आपसी तडजोडीतून न्या. एस. के. फोकमारे आणि विधीज्ञ सुनील रवानी यांनी निकाली काढले. तडजोडीतून निकाली काढण्यात आलेल्या १७७४ प्रकरणांमध्ये अन्न आणि औषध विभाग, दखल पात्र आणि दखल पात्र, आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांचा समावेश होता. यामुळे सदर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *