अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते जयपूर येथे पुरस्कार प्रदान

 

 

मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक श्री. संजय मधुकर मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र  भूषण जीवन गौरव” पुरस्काराने गौरविण्यात आले. जयपूर येथे नुकत्याच  झालेल्या “एक्सलंसी आयकॉनिक पुरस्कार वितरण समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या थ्री फिंगर्स इंटरटेनमेंट लि. च्या वतीने फाव फेअर्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी एक्सलन्सी आयकॉनिक अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा एक्सलंसी आयकॉनिक पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असलेल्या साई इंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा श्री. संजय मुळे यांची  उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
यापूर्वी  संजय मुळे यांचा  एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे ‘उद्योगश्री जीवन गौरव’, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार’ २०१५, क्वालिटी  ब्रॅण्ड टाइम्स तर्फे  ‘क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार 2015,’ एज्युकेशन अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा ‘राष्ट्रीय निर्माणरत्न पुरस्कार २०१९’अशा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *