ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा सफाई कामगार महेंद्र पिठुराम शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व्यसनमुक्ती जनजागृती सेवा समितीचे वतीने रविवारी २८ जुलैला “सफाई कामगारांचा जीवन संघर्ष” पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून समता कट्टा येथे महेन्द्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया, अध्यक्ष अजय राठोड, उपाध्यक्ष नरसी भाई झाला, सचिव संजय धिंगान, माजी अध्यक्ष ललित मारोठिया, दिलीप चौहान आणि समता विचार प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर उपस्थित होते. महेंद शिंदे यांचे वडील पिठूराम शिंदे यांच्या निधनामुळे ९वी नंतर अर्धवट शिक्षण सोडून त्यांना वडिलांच्या जागी वारसाहक्काने ठाणे महापालिकेत २००७ साली सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करावी लागली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीकॉम परीक्षा देत यंदा BSL L.L.B परीक्षा केली असल्याने सफाई कामगारांना प्रेरणा दिली असल्याचे या वेळी कामगार नेते जगदीश खैरालिया महेन्द्र शिंदे यांचे कौतुक केले आहे. महेंद्र शिंदे यांनी यावेळी बोलताना पुढे L.L.M करण्याचे मनोदय व्यक्त केला आहे.
०००००
