ठाणे : नाविकांनी नाविकांसाठी चालवलेली नूसी ही कामगार संघटना आहे. नूसीच्या वतीने नोकरी मिळण्यासाठी तरुणांना  प्रशिक्षण व नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात, अशी माहिती नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.
भारतातील नाविकांसाठी  १२८ वर्षे काम करणाऱ्या जुन्या कामगार संघटनेचे लोणावळा येथे नूसी  हॉलिडे होम आहे. या हॉलिडे होमचा नूतनीकरण सोहळा २७  जुलै २०२४ ला न्यूसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी नुसीचे पदाधिकारी सर्वश्री सुरेश सोळंकी,  अली अजगर, सलीम झगडे, लुईस गोम्स, सुंदर, नूसीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
नुसी भारतातील १२८ वर्षाची सर्वात मोठी कामगार संघटना आहे. ही नाविकांनी नाविकांसाठी  चालवलेली कामगार संघटना आहे. युनियन म्हटली की पगारवाढ व कामाच्या ठिकाणी संरक्षण मिळाले पाहिजे. नाविकांना दोन वर्षातून भरपूर पगारवाढ मिळते.  ही कामे आम्ही करतोच, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही  नोकरी मिळण्यासाठी तरुणांना  प्रशिक्षण व नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये आमचा हातखंडा आहे. भारतीय जहाजावर कुशल प्रशिक्षणानंतर नोकऱ्या मिळतात. परंतु परदेशीय  जहाजावर खूप स्पर्धा आहेत, आणि  भारतीय तरुणांनी परदेशीय जहाजावर  देखील काम केले पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही प्रशिक्षण देतो. त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा असे आवाहन लोणावळा येथे नूसी  हॉलिडे होमच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *