मुंबई :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त येत्या ९ ऑगस्टपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाड मधून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेथून संविधान जागर यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जय भीम आर्मी ( संविधान जागर यात्रा संयोजक ) नितीन मोरे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यात्रा संपूर्ण महाराष्ट्रतून जाणार असून या यात्रेद्वारे फुले – शाहू – आंबेडकर व भारताचे संविधान व त्यातील मौल्यवान विचार, मूलभूत तत्वे संविधानात असलेल्या भक्कम तरतूदी याबद्‌दल समाजात व्यापक जागृती करण्यात येणार आहे.
संविधान जागर यात्रेचे संयोजक व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड .वाल्मिक निकाळजे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे प्रमुख राजेंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन व आधार महिला कौशल विकास केंद्र मुंबई अध्यक्षा योजनाताई ठोकळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष शरद कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहाताई भालेराव,आकाश अंभोरे, नागसेन पुंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीतील सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांनी एकत्रीत येऊन बैठकांद्वारे चिंतन करून संविधान जागर समिती स्थापन केली आहे. सत्याग्रह भूमी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथुन सविधान जागर यात्रेची सुरुवात होणार असून यात्रेचा समारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील मान्यवर नेते आणि कोअर समितीचे प्रमुख सदस्य यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सकाळी १० वा होणार आहे.
ही यात्रा कोकण भूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, (उत्तर महाराष्ट्र) मार्गे संठाणे जिल्हयातून चैत्यभूमी दादर मुंबई येथे ८ संप्टेबर २०२४ रोजी सकाळी येणार आहे. दादर येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती संयोजक नितीन मोरे यांनी यावेळी दिली.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *