मुंबई :महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या महाराष्ट्राने ‘खळखटयाक’चे राजकारण नाकारलेले आहे. २००९ मध्ये १३ आमदार असलेला पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्व असलेला हा पक्ष २०२४ येतायेता केवळ एका आमदाराचा पक्ष आणि काही मर्यादित ठिकाणी राहिलेला आहे याची आठवण आनंद परांजपे यांनी करुन दिली आहे.
ज्या राज ठाकरे यांनी पिंपरी – चिंचवडचा विकास आमचे नेते अजितदादा पवार यांनी केल्याची स्तुतीसुमने उधळली आहेत त्यामुळे गजानन काळे यांची बौद्धिक पातळी कमी आहे म्हणून त्यांनी एकदा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिती घ्यावी असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो भ्याड हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध यावेळी आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केला. यावेळी प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ ऑगस्टला – शुभांगी साठे
रत्नागिरी : ५ ऑगस्टच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑगस्ट २०२४ चा लोकशाही दिन सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.१ ते २ वा. या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *