स्वराज पक्षाचा पत्रकार परिषदेत इशारा
रमेश औताडे

 

 

मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना छत्रपती म्हणण्याचा हक्क नाही त्यांचे रक्त तपासावे लागेल असा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा त्यांना दिसेल तिथे ठोकून काढू. असा इशारा स्वराज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, विशालगडावर अनधिकृत बांधकाम झाले हे कोणालाच माहित नव्हते असे नाही. सत्ताधारी व विरोधक दोघांनाही याबाबत कल्पना होती. मात्र राजकारण व मतांच्या जोगव्यासाठी आव्हाड यांनी जे वक्तव्य केले आहे ते योग्य नाही. जर त्यांनी दोन दिवसात जाहीर माफी मागीतली नाही तर त्यांना दिसेल तिथे ठोकून काढू असा इशारा कदम यांनी दिला आहे.
यावेळी स्वराज पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेश जुनघरे, राहुल गावडे, मयूर धुमाळ, स्वप्नील घोलप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *