उच्च न्यायालयातील जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय मलिकांना जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. आता याप्रकरणी नवाब मलिकांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला आहे.

दरम्यान, कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात नवाब मलिकांना ईडीनं अटक केली होती. दिर्घ कारावासानंतर नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. सध्या वैद्यकीय उपचारांसाठी जामीनावर बाहेर आहेत.

प्रकृतीच्या कारणांमुळे मलिकांना मिळालेला वैद्यकीय जामीन

नवाब मलिक यांना ईडीनं 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तींसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचं कारण देत जामीन मिळावा, अशी मागणी तेव्हा त्यांनी केलेली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र, एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *