अशोक गायकवाड

 

रायगड : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल प्राचार्य, डॉ.सुभाष महाजन यांनी दिली आहे.
प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतीत. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता-इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५% गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी ०१ ते ०५ ऑगस्ट, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे ०१ ते ०८ ऑगस्ट, प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे खुला संवर्ग रुपये २००/- खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये – १००/-.यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेरु शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करुन लगेचच प्रवेशपत्राची स्वतःच्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *