ठाणे : उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीने त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या अनोख्या चाहतीने धोनी यांचा फोटो समोर ठेऊन ८ तासांमध्ये ११८०६ स्कॉट्स पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बूकमध्ये विक्रम नोंद झाली असून कोकण पदवीधरांचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला आहे.
भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत. भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण रायगड जिल्ह्यातील अश्विनी मोंडे-जाधव या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत. त्या उत्तम कर्णधार, उत्कृष्ठ यष्टी रक्षक, तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या आनोख्या चाहत्या आहेत. गिनीज वर्ल्ड बूकमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श मानून त्यांच्या फोटो समोर हा विक्रम केला आहे. अश्विनी यांनी फोटो समोर ८ तासांमध्ये ११,८०६ स्कॉट्स पूर्ण करून गिनीज वर्ल्ड बूकमध्ये विक्रम नोंदविला आहे. त्यांच्या या अनोख्या विक्रम बद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोकण विभाग पदवीधरांचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार डावखरे यांनी केले. तर गृहिणी असतानाही मी माझ्या व्यस्त कमाल मधून स्वतःसाठी एक तास वेळ काढला. त्यामध्ये डॉ. धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून मी हा विक्रम केला. इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून माझ्यासारखे भरारी घेणे सहज शक्य आहे असे अश्विनी यांनी सांगितले.