ठाणे: पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने १९ वर्षीय करण सिंग (बिल्डींग नंबर २, मानपाडा, ठाणे) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. वर्तकनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. ठाण्यातील मुख्य तलावांपैकी उपवन हा तलाव पर्यटनासाठी खुप प्रसिद्ध आहे त्या मुले संपूर्ण ठाणे शहरातून पर्यटक येते येत असतात सध्या हे तलाव पूर्णपणे भरलेलं आहे पोहण्याची मज्जा घेण्यासाठी काही तरुण येथे हुल्लडबाजी करतात असतात अश्यातच
मानपाडा भागात राहणारा करण हा ३० जुलैला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उपवन तलावात पोहण्यासाठी उतरला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या पथकांनी शोधमोहीम राबवून त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.