मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलीली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. गोऱ्हे*
*छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै* – विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून, आज दि. ३१ जुलै रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे शिवसेना महिला पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यपूर्व,पश्चिम,गंगापूर,वैजापूर, कन्नड विधानसभा क्षेत्रातील तसेच नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिला आघाडी प्रमुख महिला पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होत्या.
यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी बस तिकीट दरामध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, उच्च शिक्षणासाठी मुलींना महिला मोफत शिक्षण, युवकांना स्टायफंड अशा प्रकारच्या सर्व योजनांची माहिती यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिली.
यावेळी आपले विरोधक आपल्या बद्दल काय वाईट नेरेटीव्ह पसरवत आहे याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे,महाभारतात जसा फक्त पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसत होता तसेच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे असे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत महिलांना सांगितले.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले दूत म्हणून काम करत आहे,आपल्याला विरोधकांसारखं जनतेशी खोटं बोलायचं नसून,जी काम शिंदे साहेबांनी केली आहेत ती जनतेपर्यंत पोहचवायची आहे. अशी माहिती यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही नुसती योजना नसून, महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आहे.एखाद्या महिलेला कोणी अपमानित करून बोलत असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊ म्हणून त्या महिलेच्या पाठीशी उभे आहेत, ही भावना त्या महिलेच्या मनात असली पाहिजे,असे डॉ. गोऱ्हे यांनी कार्यक्रमात स्पष्ट केले.
यावेळी बैठकीत श्रीमती.प्रतिभा जगताप (संपर्क प्रमुख),श्रीमती.रंजना कुलकर्णी (संपर्क प्रमुख,लातूर), श्रीमती.सविता किवंडे (संपर्क प्रमुख,बीड),श्रीमती.शिल्पा राणी वाडकर (जिल्हा प्रमुख), चंद्रकला बाई बांगर (जिल्हा प्रमुख,बीड) श्रीमती. शारदाताई घुले (महानगरप्रमुख छत्रपती संभाजीनगर), श्रीमती.कलाताई ओझा(माजी महापौर),श्रीमती.सुलभा भोपळे यांसह अनेक पदाधिकारी,महिला,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती.तेजस्विनी केंद्रे (जिल्हा समन्वयक) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
000