ठाणे : मैत्री संस्था आयोजित जिजाऊंच्या वास्तव्याने पवित्र झालेली वास्तू ऐतिहासिक माहुली गड, शहापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संप्पन्न झाले. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश ह्या कार्यक्रमनिमित्त देण्यात आला. या सदर कार्यक्रमास मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर व श्री सातेरी भूतनाथ सोनावल मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गवस, समाजसेवक किसन बोन्द्रे, योगशिक्षक संतोष खरटमोल, रेल्वे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दिपक कालिंगण , पत्रकार घनश्याम आंबोकर, किरण डवले, रोहित पोटे, विकास कदम, ऍड. अदिती गायकवाड, बौद्ध पंचायत विरारचे सेक्रेटरी विजय काकडे, संदीप पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माहुली फार्म हाऊसचे मालक भगवान वेखंडे ह्यांनी सदर कार्यक्रमांस मोलाचे संहयोग दिले व मंडळास आश्वासन दिले की लावलेली झाडे जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
००००