ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते गुरुवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते गुरुवारी, १ ऑगस्ट, २०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी ११ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपागर, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्त्रबुद्धे, सुजय भोसले, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, विधानसभा कार्याध्यक्षा लक्ष्मी वैती, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, वॉर्ड अध्यक्षा अश्विनी लाडकर, सरिता जाधव, दिपाली विचारे, युवक प्रदेश सचिव विजय धुमाळ, युवती विधानसभा अध्यक्षा सोनिया माने, विद्यार्थी पदाधिकारी हर्ष चापले, यासीर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0000