स्वाती घोसाळकर
मुंबई : प्रत्येक दिवसागणिक वंचितचे प्रकाश आंबेडकर आश्चर्यकारक भूमिका मांडत असल्याने राजकीय पंडींतासोबत राजकारणीही चकीत झाले आहेत. नरेंद्र मोदींची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी भाजपविरोधी मतात फुट पडू नये यासाठी आग्रही असणारे प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबतचे संबंध संपुष्टात आणून तिसरी आघाडी उघडण्याची घोषणा केली आणि आपले उमेदवारही जाहीर केलेत. पण आज एकीकडे शरद पवारांवर जाहिर टिका करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी त्यांची मुलगी सुप्रीया सुळेला बारामतीत बिनशर्त पाठींबा जाहिर केला आहे. तर दुसरीकडे मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शरद पवार, उध्दव ठाकरेंपासून मनोज जरांगेपर्यंत सगळ्यांच्या भेटी घेणाऱ्या वसंत मोरेंना अखेर वंचितने आसरा दिला आहे. वसंत मोरेंना पुण्यातून वंचितने उमेदवारी दिल्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे.
वंचितच्या या उमेदवारीचा फटका काँग्रेसच्या धंगेकरांना बसणार असून भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांना मतविभाजनाचा लाभ मिळेल असे राजकीय पंडितांचा दावा आहे.
वंचितकडून मविआसोबतच्या युतीच्या चर्चा थांबल्यानंतर त्यांनी स्वताहून काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठींबा देण्याची एकतर्फी घोषणा केली होती. काँग्रेसने अद्याप त्याला प्रतिसाद दिला नसला तरी प्रकाश आंबेडकर ज्या मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत त्या अकोला मतदार संघात उमेदवार दिल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. कारण अकोल्यात काँग्रेसने उमेदवार देण्यापुर्वी वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचितचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार
नांदेड – अविनाश बोसिरकर
परभणी– बाबासाहेब उगळे
छत्रपती संभाजीनगर – अफसर खान
पुणे – वसंत मोरे
शिरूर – मंगलदास बागूल
हिंगोली – डॉ. बी.डी. चव्हाण
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारसकर
सातारा – मारुती धोंडीराम जानकरधुळे – अब्दुल रहमान
हातकणंगले – दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटीलरावेर – संजय पंडीत ब्राम्हणे