ऑलिम्पिक मेडल जिंकणारा महाराष्ट्राचा पहिला शुटर
संदीप चव्हाण
पॅरिस – कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास घडविला. कोल्हापूरी जगात का लय भारी असतात हे आज स्वप्निल कुसाळेने पॅरिसमध्ये दाखवून दिले. फायनलमध्ये त्यांने अभुतपुर्व कामगिरी करीत ऑलिम्पिकचे ब्राँज मेडल जिंकून आणले. चायनाच्या लियुने गोल्ड तर युक्रेनच्या कुलीशने रौप्यपदक जिंकले.
स्वप्निलचे अवघे कुटुंब वारकरी. मुलाने ऑलिम्पिकचे पदक जिंकावे म्हणून तीने विठोबाला साकडे घातले होते. स्वप्निलने केवळ आईचेच नव्हे तर अवघ्या भारतीयांचे स्वप्न साकार केले. खाशाबा जाधवनंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारा कुसाळे हा अवघा दुसरा महाराष्ट्रीय खेळाडू ठरला. खाशाबांनी १९५२ च्या हेलिसंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ब्राँझ मेडल जिंकले होते.
यापुर्वी मुंबईकर लिएण्डर पेसनेही अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते. पण त्याने आपले स्पर्धात्मक टेनिस पश्चिम बंगालमधून केले होते.
ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारा आणि मेडल जिंकणाराही तो महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या विजयाने इकडे पॅरिसमध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
आपले आदर्श भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आहे असे स्वप्निलने सांगितले. धोणीही त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात तिकीट कलेक्टर होता. मीही पुण्यात टिकट कलेक्लटर होतो. त्याचा सिनेमा मी खुप वेळा पाहिला. त्यापासून मला प्रेरणआ मिळते असेही तो म्हणाला.
आता अवघ जग जरी तुझ् कौतुक करीत असले तरी तुझी पहिली रायफल खरेदी करण्यासाठी आई वडिलांना कर्ज काढावे लागले होते. आज तु हे ऋण व्याजासहीत परत केले असे विचारताच. आई- विडिलांचे ऋण फेडता न येण्यासारके आहेत असे त्याने नम्रपणे सांगितले.