मुंबई : ” आठ दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही खाती मला द्या फक्त आठ दिवसासाठी, मी भाजपाला दाखवून देतो, ही खाती कशी चालवतात ते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील नेत्यांनी विरोध नोंदविला.
शिंदे आणि अजित पवार हे घाबरून भाजपसोबत गेले. त्यांच्या जाण्याची कारणं ही त्यांच्या डरपोकपणात आहेत. हे ईडी, सीबीआय, आयकर विभागाला घाबरून गेले आहेत, हे जग जाहिर आहे. भाजपनं त्यांना वॉशिग मशीनमधून स्वच्छ केलं म्हणून त्यांची पाप धुवून निघणार नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे लोक गेले ते का गेले, हे सर्वांना माहीत आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमासाठी एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये राऊत उपस्थित होते. मविआचं घोडं नक्की कुठे अडलंय? सांगलीच्या जागेवर काय तोडगा निघाला? यासोबतच अनेक प्रश्नांवर संजय राऊतांनी दिलखुलास उत्तरं दिली.
